Param Bir Singh : परमबीर सिंह यांच्याविरोधातील तपास बंद करण्याचा सीबीआयचा अहवाल; पुरावे नसल्याचं दिलं कारण

खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
Param Bir Singh
Param Bir Singhesakal
Updated on

मुंबईः खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजवून दिली होती. वेगवेगळ्या महत्त्वाच्या हॉटेल आणि बार मधून वसुली गोळा करायला लावले जातात, खंडणी गोळा करायला लावली जाते, असे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते.

Param Bir Singh
Anil Babar Passed Away: शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन; एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख

त्यानंतर परमबीर सिंह आणि इतरांविरुद्ध खंडणी वसुल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. गुन्हा घडल्यानंतर पाच वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असे सीबीआयने अहवालात म्हटले आहे.

२०१६-१७ मध्ये घडलेला हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे उपलब्ध झालेले नाहीत वा आक्षेपार्ह काहीही आढळलेले नसल्याने सीबीआयने ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करुन तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे.

Param Bir Singh
RTO Firing Case: आरटीओ गोळीबार प्रकरण, कलेक्शनच्या वादातून गोळीबार करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा

परमबीर सिंग यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात धमकावणे आणि खंडणीप्रकरणी जुलै २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आता सीबीआयने पुराव्यांअभावी तपास बंद करण्यासाठी अहवाल सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.