मुंबई- राज्यात दोन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या घोषणा होत असल्याचं दिसत आहे. राज्यात कोट्यवधी रुपयांच्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात येत आहेत. या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालघर जिल्ह्यात वाढवण येते उभारला जाणारा प्रोजेक्ट हा असाच महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे.
वाढवण बंदराचा प्रोजेक्ट हा राज्याच्या विकासासाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. हा प्रोजेक्ट पूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर या माध्यमातून १२ लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७२ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च करून हा प्रोजेक्ट उभारला जात आहे. या बंदरामध्ये अनेक सुविधा असणार आहेत.