महाराष्ट्रासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; पालघरमधील 'या' बंदराला दिली मंजुरी, तब्बल 12 लाख रोजगार निर्मिती होणार

वाराणसी येथील विमानतळाचा विस्तार केला जाणार आहे.
Vadhavan Bandar in Dahanu
Vadhavan Bandar in Dahanuesakal
Updated on
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात देशाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

नवी दिल्ली : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला (Vadhavan Bandar) ‘मोदी पर्व-३’च्या पहिल्याच मंत्रिमंडळबैठकीत मंजुरी देऊन महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास ७६ हजार २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण होणार असून पहिला टप्पा २०२९ मध्ये पूर्ण होईल.

यातून १२ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात देशाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली.

Vadhavan Bandar in Dahanu
लोकसभेत विजय मिळवूनही राणेंच्या अडचणी वाढल्या; भाजप खासदाराची थेट निवडणूक आयोगाकडं तक्रार, काय आहे कारण?

यात १४ पिकांच्या किमान हमी भावात भरघोस वाढ करण्यात आली आहे. वाराणसी येथील विमानतळाचा विस्तार केला जाणार आहे. नवीनीकरण ऊर्जेच्या क्षेत्रात गुजरात व तमिळनाडूमध्ये ‘ऑफशोअर विंड टर्मिनल’ विकसित केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.