Amit Shah: अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर! चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापुरात; नाराजीच्या चर्चांना उधाण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर
Amit Shah
Amit ShahEsakal
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री मुंबईत दाखल होणार आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, त्यासाठी शाह मुंबईत दाखल होणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आहे. या बैठकीत अमित शहा घेणार मिशन 45 चा आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत.

अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना त्यांचे जवळचे समजले जाणारे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील मात्र गैरहजर असणार आहेत. त्यांच्या या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आज भाजपच्या महत्वाच्या नेत्यासोबत सह्याद्री अतिथिगृहावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अमित शहा घेणार मिशन 45 चा आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत.

Amit Shah
Amol Kolhe: "आधी आभाळ बघायचं, वारं बघायचं मग..."! अमोल कोल्हेंचं सूचक वक्तव्य

अशातच अमित शाह यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापूरमध्ये आहेत. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद संदर्भात केलेल्या व्यक्तव्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा होत असताना चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असताना चर्चांना उधाण आलं आहे.

Amit Shah
Sharad Pawar: राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादीने कर्नाटकमधील निवडणूकीबाबत घेतला मोठा निर्णय

राजकीय वर्तुळात चंद्रकात पाटील यांना एकटं पाडलं जात आहे का? ही शक्यता आता दाट होताना दिसत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा होत असताना चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असताना चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण नेमकं कसं आहे. यासोबत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात मुंबईत भाजपची स्थिती काय आहे याची माहिती अमित शाह या बैठकीतून घेणार असल्याची माहिती आहे.

Amit Shah
Ajit Pawar: अजित पवारांना मविआमध्ये उपमुख्यमंत्रिपद का दिलं? जयंत पाटील म्हणाले...

शिंदे-फडणवीस सरकारची सध्याची परिस्थिति काय आहे? राज्यातील योजना कशा सुरू आहेत. केंद्राकडून येणाऱ्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळतोय की नाही? येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात येणार आहे. भाजप नेते आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे हे या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

Amit Shah
Ramesh Bais: महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचीही होणार गच्छंती? निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.