Prithviraj Chavan
Prithviraj Chavan sakal

Prithviraj Chavan : शेतकरी आत्महत्येस केंद्राची धोरणे जबाबदार ;पृथ्वीराज चव्हाण,मनोज सोनी यांची सीबीआय चौकशी करावी

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर बनावट दाखल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण केंद्र सरकारचे डीओपीटी मंत्रालयाच्या अधीन असून, याचा कारभार पंतप्रधान मोदींकडे आहे.
Published on

सातारा : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर बनावट दाखल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण केंद्र सरकारचे डीओपीटी मंत्रालयाच्या अधीन असून, याचा कारभार पंतप्रधान मोदींकडे आहे.

खेडकर प्रकरणात ज्या चुका या मंत्रालयाकडून झाल्या आहेत, त्याची जबाबदारी या मंत्रालयावर व मोदींवरही येते. त्यामुळे याप्रकरणी यूपीएससीचे माजी अध्यक्ष मनोज सोनी व त्यांच्या विभागाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असणे, ही चिंतेची बाब असून, याला केंद्राची शेतकरी विरोधी धोरणे जबाबदार आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांनी लोकसभेला महायुतीला विरोध केला. आता विधानसभेतही विरोध करून राज्यात सत्ता परिवर्तन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चव्हाण यांनी पूजा खेडकर, शेतकरी आत्महत्या या विषयावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी व भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या डीओपीटी या मंत्रालयाच्या आधीन यूपीएससी काम करते. या मंत्रालयाचे मंत्री पंतप्रधान मोदी आहेत. खेडकर प्रकरणात या विभागाकडून ज्या चुका झाल्या आहेत, ती जबाबदारी या मंत्रालयाने घ्यावी.

ही जबाबदारी मोदींवरही येते, तसेच यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ते गुजरातचे असून, मोदींचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना वयाच्या ३९ व्या वर्षी उपकुलगुरू होण्याचा मान मिळाला आहे. त्यांनी राजीनामा दिला असून, ते पण जबाबदारी टाळू शकत नाहीत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.