General Coaches in Trains : मध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! मेल-एक्स्प्रेसना जोडले जाणार दोन जनरल डबे

2 more general coaches in mail, express trains : कोरोनाकाळात भारतीय रेल्वेने मेल एक्स्प्रेस गाड्यांतील साधारण डब्याची संख्या एक आणि दोन करण्यात आलेली होती.
General Coaches in Trains
General Coaches in Trains
Updated on


मुंबई, ता. १६ : आरक्षित तिकीट नसले तर रेल्वे प्रवास करता येत नाही; मात्र आता प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने प्रत्येक मेल-एक्स्प्रेस गाड्यांना दोन साधारण डबे जोडण्याचा निर्णय घेतल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेने साधारण वर्गाचे १५० डबे विविध गाड्यांना जोडले आहेत. डिसेंबरपर्यंत सर्व गाड्यांना हे डबे जोडण्याचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.