Central Railway : मध्य रेल्वेची मालवाहतूकीतून २३५४.४० कोटीची कमाई!

मध्य रेल्वेने गेल्या तीन महिन्यात २२.३५ दशलक्ष टनची विक्रमी मालवाहतूक करत २३५४.४० कोटी एवढा महसूल मध्य रेल्वेने मिळवला आहे.
Railway Cargo Transport
Railway Cargo Transportsakal
Updated on

मुंबई - मध्य रेल्वेने गेल्या तीन महिन्यात २२.३५ दशलक्ष टनची विक्रमी मालवाहतूक करत २३५४.४० कोटी एवढा महसूल मध्य रेल्वेने मिळवला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत २२.३४ दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली होती. त्यामध्ये ३.३३ टक्के वाढ झाली असून आतापर्यतची सर्वोत्तम मालवाहतूक असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.

एप्रिल-जून पर्यंत तिमाही मालवाहतूकीतून गेल्या वर्षी २१५३.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, यंदा तिमाहीत २३५४.४० कोटी रुपयांची केली असून जी गेल्या वर्षच्या तुलनेत ९.३१ टक्क्यांनी अधिक आहे.

मध्य रेल्वेने जून-२०२२ मधील ७२०.९ कोटींच्या तुलनेत जून २०२३ मध्ये ८०६.१० कोटींचा मूळ मालवाहतूक महसूल मिळवला.

जून २०२३-२४ पर्यंत मालाचा महसूल २३५४.४० कोटी आहे. जो मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ९.३१ टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेने जून २०२३ मध्ये सिमेंट आणि क्लिंकरचे २३६ रेक लोड केले आहेत जे जून २०२२ मध्ये १७८ रेकच्या तुलनेत १.८ टक्क्यांनी अधिक आहेत.

जून २०२२ मध्ये ६८ रेकच्या तुलनेत जून २०२३ मध्ये ऑटोमोबाईल्सचे ९७ रेक लोड करण्यात आले आहेत. याशिवाय जून २०२३ मध्ये कंटेनर लोडिंगमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.६ टक्यांने सुधारणा झाली असून जून २०२२ मध्ये २५९८ रेकच्या तुलनेत जून २०२३ मध्ये २६४५ रेक लोड करण्यात आले आहेत.

तसेच जून २०२२ मधील ८५ रेकच्या तुलनेत जून २०२३ मध्ये १५२ लोह आणि स्टीलचे रेक लोड होत आहेत. तर २०२३ मध्ये ६८ लोहखनिजाचे रेक लोड केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.