सीईओ आव्हाळे यांचे प्राथमिक शिक्षण विभागाला आदेश! शाळांना भेटी देऊन पॅट चाचणी तपासणीचा मागितला अहवाल; ...तर मुख्याध्यापकांना नोटिसा द्या

पॅट संकलित चाचणीच्या पेपर तपासणीत आढळलेल्या त्रुटींची जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्रुटी आढळलेल्या शाळांना भेटी देऊन ऑनलाइन व ऑफलाइन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
school
schoolsakal solapur
Updated on

सोलापूर : पॅट संकलित चाचणीच्या पेपर तपासणीत आढळलेल्या त्रुटींची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्रुटी आढळलेल्या शाळांना भेटी देऊन ऑनलाइन व ऑफलाइन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी शाळांना भेटी देऊन केलेल्या पॅट संकलित चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पेपरची तपासणी केली. त्यात अनेक चुका आढळल्याने त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) अधिकाऱ्यांना पेपर तपासणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी अनेक शाळांना भेटी देऊन पेपरची तपासणी केल्यावर त्यात ५३ शाळांतील पेपरमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

अशा परिस्थितीत पेपर तपासणीत त्रुटी आढळल्याची बाब त्यांनी गांभीर्याने घेऊन प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात शिक्षणाधिकारी कादर शेख व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या यांच्या नेतृत्वाखाली उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांना शाळा तपासणीसाठी भेटी वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

...तर मुख्याध्यापकांना नोटिसा द्या

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पेपर तपासणीनंतर मुख्याध्यापक व शिक्षकांनी केलेली पेपर तपासणी समाधानकारक नसल्याचा अहवाल त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांना दिला आहे. त्यानंतर त्यांना त्या ५३ शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत त्रुटींचे खुलासे सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. याबाबत वारंवार सूचना देऊनही सुधारणा होत नसल्यास मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस काढा, असे आदेश त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.