राज्यात सत्ताधारी विरुद्ध भाजप वाद टोकाला गेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना संपवण्याचा डाव असल्याची व्हिडीओ क्लिप अध्यक्षांना सुपूर्द केली आणि यानंतर राजकीय नाट्याने वेग घेतला आहे. फडणवीसांचे महाविकास आघाडीवरील आरोप खरे ठरल्यास सरकारच्या अडचणी वाढणार हे स्पष्ट झालंय. (Chandrakant Patil Demands Resignation of Nawab Malik)
दरम्यान, अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राजीनाम्यासाठी भाजपने आजही आंदोलन पुकारलं आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आता भाजप आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे. (ED Raids Nawab Malik Property)
नवाब मलिकांच्या विरोधात भाजपने कंबर कसली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मविआ सरकारच्या नेत्यांवर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारवर ममता दिदींचा नाही तर दाऊदचा दबाव आहे, असा आरोप त्यांनी केला. यामुळेच हे सरकार नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही, असं ते म्हणाले. दाऊदने फोन केला म्हणून ते मलिकांचा राजीनामा घेत नाही, असा आरोप पाटील यांनी केलाय.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) कथित स्वरुपात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर त्यांना कोर्टानं १३ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली होती. यानंतर पुन्हा मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.