Maharashtra Rain Update: राज्यात पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाची शक्यता; मुंबई, कोकणामध्ये जोरदार बरसणार

Maharashtra rainfall News today: मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पुढील ३-४ तास मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Updatesakal
Updated on

Maharashtra Weather Update: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पुढील ३-४ तास मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट पाहायला मिळेल. नाशिक, धुळे ,जळगाव, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update: मराठवाड्यात पावसाचे जोरदार पुनरागमन, तर कोकणातही मुसळधार

सकाळी सात वाजता हवामान विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच, वारा ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती कायम राहील. मुंबईमध्ये देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. काल रात्री मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपलं आहे.

Maharashtra Rain Update
Marathwada Rain Update: मराठवाड्यात अतिवृष्टी; दुकान व घरात शिरले पाणी,'या' मंदिराचा कोसळला भाग!

पुण्यातील पावसाची स्थिती

परतीच्या पावसानं पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं शंभर टक्के भरली आहेत.

त्यामुळं या धरणांमधून मुळा-मुठा तसंच पवना नदी पात्रातील विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठच्या लोकांनी पूरस्थितीपासून सावध रहावं असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

24 सप्टेंबरला पुढील जिल्ह्यांत विजांसह पाऊस पाहायला मिळाला- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, जळगाव, धुळे | सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर | लातूर, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छ. संभाजीनगर, धाराशिव, नांदेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.