कुलगुरु डॉ. महानवर यांचा प्रेरणादायी प्रवास! अर्धा एकर शेती, आई-वडिल अशिक्षित, राहायला झोपडी, माळरानावर राखली मेंढरे, पण...

मूळचे देवडी (ता. माण, जि. सातारा) येथील डॉ. प्रकाश महानवर यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. त्यांच्याकडे अर्धा एकर शेती अन्‌ काही मेंढरे होती. आई-वडील दोघेही अशिक्षित असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही हे विशेष.
डॉ. प्रकाश महानवर
डॉ. प्रकाश महानवरSakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. महानवर यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ६) ते पदभार स्वीकारणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर डॉ. महानवर हे सध्या कार्यरत आहेत. तत्कालीन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा कार्यकाळ ५ मे २०२३ रोजी संपला होता. त्यानंतर नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्याकडे कुलगुरुपदाची तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात आली होती.

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी ‘आयआयटी’ कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैदराबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. सुरेशकुमार (युजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सच‍िव विकास चंद्र रस्तोगी हे त्या समितीचे सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यानंतर त्यातील पाच जणांची नावे राज्यपालांना कळविण्यात आली होती. त्यातून डॉ. महानवर यांची कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अर्धा एकर शेती, राहायला झोपडी, माळरानावर मेंढरे राखत घेतले शिक्षण

मूळचे देवडी (ता. माण, जि. सातारा) येथील डॉ. प्रकाश महानवर यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. त्यांच्याकडे अर्धा एकर शेती अन्‌ काही मेंढरे होती. आई-वडील दोघेही अशिक्षित असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही हे विशेष. माळरानावर मेंढरे राखतच त्यांनी माध्यमिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. प्रकाश यांनी मानगड येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहिवडी येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठात विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले आणि त्याच विद्यापीठात नोकरीला लागले. विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करताना त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यपालांनी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.