चंद्रकांत खैरेंचा नवनीत राणांना दम, म्हणाले मुख्यमंत्र्यांबद्दल वाईट...

'तुम्ही मला तिच्याबद्दल काही विचारू नका, मी बोललो की मग ते सगळं व्हायरल होतं'
politics
politicsgoogle
Updated on
Summary

'तुम्ही मला तिच्याबद्दल काही विचारू नका, मी बोललो की मग ते सगळं व्हायरल होतं'

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हनुमान चालीसा पठणासाठी त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. दरम्यान, आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनीत राणा ही बाई आहे का कोण आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ती काहीही बोलते. तुम्ही मला तिच्याबद्दल काही विचारू नका, मी बोललो की मग ते सगळं व्हायरल होतं. खासदार राणा यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल काही बोलू नये, अन्यथा आम्ही तिला सरळ करू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. आज बीड येथे बोलताना त्यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला.

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणत्याही मतदारसंघातून माझ्या विरोधात निवडूक लढवून दाखवा असे आव्हान दिले आहे. त्यासंदर्भात विचारले असता खैर म्हणाले, राणा आम्ही तुम्हाला सरळ करू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या राज्याचा कारभार उत्तमपणे सांभाळत आहे. असे असतांना ही बाई त्यांच्याबद्दल काहीही बोलते. ही बाई आहे की कोण ? मी तिच्याबद्दल काही बोललो की पुन्हा ते व्हायरल होईल. आम्हा शिवसैनिकांचा राग डोक्यात गेला की आमची अक्कल गुडघ्यात येते, मग आम्ही काहीही करू शकतो, तिला सरळ करू शकतो, अशी एकेरी शब्दांत त्यांनी टीका केली.

politics
तुम्ही राजीनामा द्या, आमदार राष्ट्रवादीचा करु; सेना नेत्याला टोला

पुढे ते म्हणाले, आमच्या दैवताबद्दल ती काही बोलली तर आम्ही ते कसे सहन करणार. ती बाई कोण आहे, कशी आहे हे सगळ्यांना माहित आहे. जातीचे खोटे प्रमाणपत्र, पक्ष बदलणारी ती बाई आहे. आधी राष्ट्रवादीचा तिला सपोर्ट होता, आता भाजपचा आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यावर टीका करतांना भाजपची पातळी घसरत चालली असल्याची टीकाही खैरे यांनी केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, आमचे जुने मित्र आहेत, ते फक्त भाषण करतात, ते बुद्धिजीवी आहेत. उद्धव ठाकरेंना शांतपणे कार्य करू द्या. महाराष्ट्र एक नंबरवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र या कामातही खोडा घालण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जातात. लोकांची दिशाभूल करण्याचे कामही फडणवीस करत असल्याचा आरोप खैरे यांनी यावेळी केला.

politics
'मनसेला महाराष्ट्र दिसतो पण भाजपशासित कर्नाटक दिसत नाही का?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.