उस्मानाबाद, औरंगाबादच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण; खैरेंचं मोठं विधान

Chandrakant Khaire said the process of changing names of Osmanabad and Aurangabad district has been completed
Chandrakant Khaire said the process of changing names of Osmanabad and Aurangabad district has been completed chandrakant khaire
Updated on

राज्यातील उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या नामांतराबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांपासून अशी मागणी होती असे खैरे यावेळी म्हाणाले. (Chandrakant Khaire said the process of changing names of Osmanabad and Aurangabad district has been completed)

कार्यकर्त्यांची इच्छा खूप होती, धाराशिव व संभाजीनगर नावे अधिकृत कधी होणार अशी विचारणा केली जात होती, पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मुंबईच्या भाषणात सांगितलं की आपण म्हणतोच संभाजीनगर, त्यावर अनेकांनी प्रश्न केले की ही नावे अधिकृत कधी करणार. धाराशिव आणि संभाजीनगर या नावांची कायदेशीर तयारी पुर्ण झाली आहे. ते कधीही जाहीर करतील असे खैरे यांनी सांगितले.

Chandrakant Khaire said the process of changing names of Osmanabad and Aurangabad district has been completed
..तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणार - विजय वड्ट्टेवार

मागील बऱ्याच दिवसांपासून या दोन शहरांच्या नामांतराची मागणी होत आहे, दरम्यान आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याने अनेक दिवसांपासून रखडलेली ही मागणी लवकर पूर्ण होईल, दरम्यान सरकार अधिकृत घोषणा कधी करेल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Chandrakant Khaire said the process of changing names of Osmanabad and Aurangabad district has been completed
कोरोना पुन्हा वाढतोय, सलग तिसर्‍या दिवशी हजारापेक्षा जास्त रूग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.