पाटील नागालँडचे राज्यपाल, राऊत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; एकमेकांचे खोचक टोले

chandrakant patil sanjay raut
chandrakant patil sanjay raute sakal
Updated on

मुंबई : चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी 'माजी मंत्री म्हणून नका' असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांचा भावी सहकारी म्हणून उल्लेख केला. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तसेच चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

chandrakant patil sanjay raut
उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

चंद्रकांत दादा हे राजकीय विरोधक जरी असले तरी ते आमच्या सर्वांचे चांगले मित्र आहेत. आमच्या त्यांना कायम सदिच्छा आहेत. चंद्रकांत पाटील ते म्हणाले मला माजी मंत्री म्हणू नका. पण त्यांची ही माजी म्हणून घ्यायची वेदना मी समजू शकतो. पण मी त्यांना निरोप पाठवला आहे की पुढील पंचवीस वर्ष तुम्हाला माजी म्हणूनच राहावं लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सरकार किमान पंचवीस वर्षे चालवू. त्यामुळे पंचवीस वर्ष मनाची तयारी ठेवा, ते जर स्वप्न पाहत असतील तर त्यांना बघू द्या, अजून तरी स्वप्नावर कोणताही टॅक्स लावलेला नाही.

माझ्या असे कानावर आले आहे की, नागालँडचे राज्यपाल म्हणून त्यांना विचारणा केली आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असे म्हणाले असतील. जर नागालँडचे राज्यपाल म्हणून ते जात असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा, असेही संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला -

उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे हे जाणण्याएवढा मी मनकवडा नाही. संजय राऊत यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार आहेत, अशी मला माहिती आहे, असा खोचक टोला पाटलांनी लगावला आहे. संजय राऊतांना कोणी गांभीर्याने घेत नाही.

चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले होते? -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका असं म्हटल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी गेले असता त्यांचा उल्लेख सतत माजी मंत्री असा केला जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन ते तीन दिवसात कळेल असं सांगितलं. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. देहुतील एका कार्यक्रमात मंचावर व्यक्तीने सतत माजी मंत्री असा उल्लेख केला. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एका दुकानाचे उद्घाटन झाले. त्यावेळी माइकवरून सूत्रसंचालन करणारी व्यक्ती सातत्यानं माजी मंत्री असा उळ्लेख करत होती. तेव्हा मधेच चंद्रकांत पाटील यांनी त्या व्यक्तीला थांबवत मला माजी मंत्री म्हणू नका असं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.