चंद्रकांत पाटलांनी ढोल वाजवत केले देवेंद्र फडणीवसांचे स्वागत

आज मुंबईच्या प्रदेश कार्यालयासमोर भाजपने जल्लोष केला.
Chandrakant Patil
Chandrakant Patilesakal
Updated on

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या चार राज्यांच्या निकालानंतर भाजप कार्यंकर्त्यांनी गुलाल आणि फटाके उडवत जल्लोष केला. काल निकालानंतर देशभरात फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. गोव्यात यंदा भाजप भारी पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस (Devendra Fadnavis) यांनी निवडणूक जिंकण्यासाठी बऱ्याच युक्त्या लढवल्या. गोवा राज्य हाती घ्यायचचं हा जणू त्यांनी चंगच बांधला आणि अखेर त्यांनी गोव्यात (Goa) बाजी मारलीच. गोव्यातून आज देवेंद्र फडणीवस मुंबईत परतले. त्यांच्या स्वागतासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांपासून (Chandrakant Patil) भाजपच्या बड्या नेत्यांची फौज तयार होती. यावेळी चंद्रकांत दादांना मात्र कार्यकर्त्यांचा जोष पाहून ढोल वाजवण्याचा मोह आवारला नाही त्यांनी चक्क ठेकाच धरला आणि ढोल बडवण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे. आज मुंबईच्या प्रदेश कार्यालयासमोर भाजपने जल्लोष केला.

चार राज्यातील भाजप कार्यंकर्त्यांचा जल्लोष पाहून कालही ढोल ताशाच्या तालावर चंद्रकांतदादा थिरकले होते. आज मात्र त्यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी चक्क ढोल वाजवण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांसोबत फुगडीही घालली. या यशाबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

भारतीय जनता पार्टी हा देशातला सर्वात जास्त विश्वासार्ह पक्ष आहे, याची जाणीव पुन्हा एकदा भारतीय जनतेने करून दिली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा राज्यांमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत आपली विजयी घोडदौड अखंड ठेवली आहे. भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं यश मिळणं अपेक्षितच होतं. ५० वर्ष राजकारणात घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत, हेच या निवडणुकीत पाहायला मिळालं. भाजपाची ही विजयी घोडदौड २०२४ मध्येही सुरूच राहणार आहे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.