Chandrakant Patil: कसब्यात एकही बंडखोर उभा राहिला नाही, कारण...; मविआच्या अस्तित्वावर चंद्रकांतदादांचं भाष्य

मविआच्या वज्रमूठ सभेवरही पाटील यांनी भाष्य केलं आहे.
 chandrakant Patil
chandrakant Patilsakal
Updated on

पुणे : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. वज्रमूठ सभा ही भातीतून जन्माला आली असल्याचं सांगताना मविआ आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कसब्यातल्या पोटनिवडणुकीचा संदर्भही त्यांनी याच्याशी जोडला आहे. (Chandrakant Patil Comment on Existence of MVA regarding Vajramooth Rally)

 chandrakant Patil
PM Narendra Modi : मोदींची डिग्री नव्या संसदेच्या गेटवर लावा; संजय राऊतांची मागणी

पाटील म्हणाले, "प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते. आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची लढाई सुरु आहे. त्यामुळं कसब्यात एकही बंडखोर उभा राहिलेला नाही, कारण २०२४ मध्ये मविआतील प्रत्येक पक्षाला स्वतःच्या अस्तित्वाची चिंता होती. कारण यांपैकी कोणीही एक निवडून आला तर आपलं काय व्हायचं? ही भीती त्यांना होती. त्यामुळं त्यांनी एकत्र निवडणूक लढवली. वज्रमूठ त्यांचा अधिकार आहे पण हे भीतीतून आलेलं आहे. कारण जर आपण एकत्र राहिलो नाही तर काय होईल याची त्यांनी भीती आहे"

 chandrakant Patil
Pune Crime: पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच; अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते

मोदींच्या डिग्रीवर केलं भाष्य

पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवरुन सध्या देशभरात बराच खल सुरु आहे. यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात काही राजकीय, सांस्कृतीक, सामाजिक संकेत आहेत. यामध्ये आपण कोणाबद्दल बोलावं काय बोलावं, काय बोलावं याचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या डिग्रीचा विषय जो चालला आहे तो चालू द्या, पण दोन विरोधी पक्षांनी टीका टिप्पणी करताना देशाच्या पंतप्रधानांवर बोलताना संयम ठेवला पाहिजे. सामान्य माणसाच्या मनात यामुळं आरोप करणाऱ्यांविरोधात निगेटिव्ह भाव निर्माण व्हायचा तो होतो.

हे ही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

गिरणी कामगाराचा वारंवार उल्लेख सुखावतो

चंद्रकांत पाटलांच्या विधानांवरुन वाद निर्माण होतो यावर बोलताना पाटील म्हणाले, "एका गिरणी कामगाराच्या मुलाचा उल्लेख वारंवार होतो याचं मला बरं वाटतं. वाईट एवढचं वाटतं की, झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही. त्यांनी मी असं म्हणेनं की व्हिडिओ लावूया आणि माझं काय चुकलं ते सांगा"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.