... तर सोन्याचा मुकुट घालेन; चंद्रकांतदादांचे भाजप पदाधिकाऱ्यांना नवे 'टार्गेट'

chandrkant patil, jayant patil
chandrkant patil, jayant patilGoogle
Updated on

सांगली : महापालिकेत ‘कार्यक्रम’करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. एकदा एक ‘मोठा शॉक’द्या. तुमचा सोन्याचा मुकुट घालून सत्कार करतो, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil)यांनी महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी नवे 'टार्गेट' दिले.

महापालिकेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण समिती सभापती निवडीत भाजपने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना यांच्या संभाव्य कार्यक्रमाला दाद न देता आपले वर्चस्व ठेवले. याबद्दल जयंत पाटील यांचे नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करीत नवे 'टार्गेट' दिले. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी महापौर- उपमहापौर निवडणुकीत भाजप सोडून गेलेल्यांना परतण्याचे आवाहनही केले.

महापालिका आणि इस्लामपूर नगरपरिषदेत सत्तांतर घडवून भाजपने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धक्के दिले आहेत. नुकतेच महापालिकेच्या सभापती निवडीतही राष्ट्रवादीचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत. हा धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांना पराभूत करून धक्का देण्याचे 'टार्गेट' दिले आहे.

chandrkant patil, jayant patil
इचलकरंजी हादरली : तलवारीने सपासप वार करीत तरुणाचा निर्घृण खून

ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात काहींना आम्ही म्हणजे महाराष्ट्र असे वाटत होते. ‘फोडा आणि झोडा’असे राजकारण केले जात होते. अशा प्रकारच्या राजकारणाला देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये छेद दिला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे राजकारण केले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत एका पक्षाचे १०० हून अधिक आमदार निवडून आले.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, सुरेश आवटी, पृथ्वीराज पवार, प्रकाश बिरजे, निरंजन आवटी आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे महापौर निवडणुकीवेळी फुटलेले नगरसेवक आनंदा देवमानेही उपस्थित होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते स्थायी समितीचे नूतन सभापती निरंजन आवटी, समाजकल्याण सभापती सुबराव मद्रासी, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()