मध्यप्रदेशमध्ये आरक्षण मिळत मग महाराष्ट्रात का नाही?, चंद्रकांत पाटलांचा सवाल
महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी समाजाची फसवणुक केली आहे. मध्यप्रदेशमध्ये आरक्षण मिळत मग महाराष्ट्रात का नाही?, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांनी विकासाच्या नावाखाली जनेतेला गुळ दाखवला आहे. फसवणुक करणं आणि गुळ दाखवणं ही त्यांची परंपरा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ओबीसी समाज आता याला बळी पडणार नाही. कारण महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे समाजाला कळल्याने ते भडकेले आहेत, म्हणून त्यांनी हे आंदोलन छेडले आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. (Chandrakant Patil on Sharad Pawar)
ते म्हणाले, ओबीसी समाजाचं महाविका आघाडी सरकारवर राग आहे. आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी समाजाची फसवणूक केली असल्याचे ओबीसींना माहिती झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता भाजपला आरक्षण मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. ओबीसी समाजाच्या मनामध्ये राग आहे. तो व्यक्त करण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी आज ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. भाजपाने यावर मार्ग काढावा यासाठी समाजाने विनंती केली आहे. यावेळी भाजपाकडून महाविआचा निषेध करण्यात आला
पुढे ते म्हणाले, मध्यप्रदेश सरकार त्रिस्तरीय चाचणी ताकदीने पूर्ण करून दिल्या आहेत. आरक्षणासंदर्भातील तरतुदी न्यायालयाला पटवून देऊन पुन्हा ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवले आहे. यापूर्वी वेळ असूनही या चाचणी संदर्भात महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी पावले उचलेली नाहीत. जनेतचा भाजप आणि फडणवीसांवर विश्वास असल्यामुळं ओबीसी आरक्षणसाठी भाजपचं आंदोलन केलं आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत समाजाच्या मनात सरकारविरोधात आक्रोश आहे, म्हणून ते भाजप कार्यालयासमोर आले आहेत. पुढील पाच वर्षांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत, हे समाजाला समजलं आहे. वेळ झाल्याने या निवडणुका होणार असून संघर्ष करुनही आरक्षण मिळेल असे वाटत नाही त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारले आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.