Chandrakant Patil: पालकमंत्रीपदाच्या बदलानंतर चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांसोबत तासभर चर्चा; पण....,भेटीचं कारण आलं समोर

पालकमंत्रीपदाच्या बदलानंतर चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर जाऊन भेट घेतली त्यामुळे चर्चांना उधाण आलं
Chandrakant Patil
Chandrakant PatilEsakal
Updated on

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन डच्चू देण्यात आला. आता मुंबईत हालचालींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. विशेष म्हणजे अजित पवार हे परस्पर बैठका घेत असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये आणि पुणे भाजपमध्ये धुसफूस असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत सातत्याने चर्चा सुरु होत्या.

या दरम्यान काल महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. अजित पवार काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल ( 3 ऑक्टोबर 2023) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिल्लीला रवाना झाले.

Chandrakant Patil
Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकार नरमले,न्यायालयाने फटकारल्यानंतर 'मविआ'ने मंजुर केलेल्या विकासकामावरील स्थगिती मागे

राज्याच्या राजकारण गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. काल (बुधवारी) 11 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची सुधारित नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये काही नेत्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी कोणतेच बदल नाहीत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आता सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. काल हा निर्णय जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचला. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं.

Chandrakant Patil
कोरोनानंतर २७६३ जणांची नैराश्यातून आत्महत्या! पालक अन्‌ मुलांमधील सुसंवाद हरविला; १४४१६ या क्रमांकावर कॉल करा, मिळेल मोलाचा सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. अजित पवार हे परस्पर बैठका घेत असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये आणि पुणे भाजपमध्ये धुसफूस असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. या दरम्यान काल महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. तर या निर्णयानंतर चंद्रकांत पाटील नाराज आहेत का अशा चर्चा सुरू होत्या, तर या निर्णयानंतर चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

Chandrakant Patil
Bhaskar Jadhav : राज्यात 8 महिन्यांत 9 ठिकाणी जातीय दंगली, या मागं भाजपचाच हात; आमदार जाधवांचा गंभीर आरोप

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी एक तास चर्चा झाली, आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा समोर आली. मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी ते वर्षा निवासस्थानी आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पुण्याचे पालकमंत्री पद गेल्यानंतर ही भेट झाली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Chandrakant Patil
Pune Rain : पुणे शहर, जिल्ह्यात सरासरीच्या ७९ टक्केच पाऊस

चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी दिली आहे. चंद्रकात पाटील आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार हे आधीच ठरलेलं होतं, भेटीचा विषय पालकमंत्री पद हा नाही. अजित पवार जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हाच सर्वांना समजलं होतं की राष्ट्रवादीलाही काही जागा द्याव्या लागणार आहेत. या सगळ्या विरोधकांनी भासवलेल्या गोष्टी आहेत, असं किरण पावसकर यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com