महाराष्ट्रात सध्या महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधानांची मालिकाच सुरू आहे, आज भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी शाळा उभ्या केल्या तेव्हा त्यांना भीक मागितली असं विधान केलं आहे. या विधानानंतर याचे पडसाद तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे,
महापुरूषांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागीतली या विधानाचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी समर्थन केलं आहे. पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी त्यांच्याबद्दल आदरच व्यक्त केला आहे. त्या शाळा सुरू करताना त्यांनी सरकारकडे अनुदान मागितलं नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. आता भीक म्हणजे काय, आत्ताच्या भाषेत सीएसआर, वर्गणी किंवा देणगी म्हणू असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
पुढे बोताना पाटील म्हणाले की, आपण साधरणतः म्हणतो की, दारोदार भीक मागीतली आणि संस्था वाढवली. संत विद्यापीठ सुरू करण्यासाठी सरकाच्या मदतीवर कशाला अवलंबून राहता समाजामध्ये देणारे लोकं खूप आहेत, हे सांगताना मी वाक्य जोडलं की, शाळा कोणी सुरू केल्या बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या आणि माझा गमजा... तेव्हा दहा रुपय सुध्दा लोकं द्यायचे त्यावर त्यांनी संस्था चालवल्या. या प्रत्येक गोष्टीला शेंडा-बुड नाही म्हणून वाद निर्माण करायचं चाललंय जे कोणी ही क्लीप पाहतात ते या लोकांचं काय चाललंय असं म्हणतात, असे चंद्रकांत पाटील असे म्हणाले.
भीक एवजी देणगी शब्द वापरावा का असे विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, अरे बाबा मधुकरी मागून शिकलो म्हणजे काय? भीक मागून शिकलो. लोकांकडे हात पसरून मी शाळा चालवल्या, धान्य गोळा करायचे भाऊराव पाटील. मी त्या भागातला आहे, माहिती नसेल तर कर्मवीर भाऊराव पाटील वाचा असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे घरोघर धान्य मागायचे त्याला देणगी मागत होते असं म्हणू. हा प्रचलित शब्द आहे की भीक मागून मी माझी संस्था वाढवली यात काय चुक आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.