"५० लाखांसाठी एवढा त्रास, तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येईल"

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना सामनातील टिकेवरून प्रत्युत्तर दिलं आहे.
sanjay raut chandrakant patil
sanjay raut chandrakant patil
Updated on

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली. यानंतर आता पाटील यांनीही मैदानात उडी घेत प्रत्युत्तर दिलं आहे. ईडीपासून ते मुश्रीफांपर्यंत सर्व प्रकरणांवर चंद्रकांत पाटील यांनी ६ ट्वीट केले आहेत. आज सामनातून पाटील यांच्यावर जहरी टिका करण्यात आली. यानंतर आता पाटील आक्रमक झाल्याचे चित्र आहे. सेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत आता वाकयुद्ध सुरू झाल्याचं दिसतं.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून माझ्यावर चिखलफेक केली. पण त्यांना उत्तर देणे प्रोटोकॉलनुसार योग्य ठरणार नाही म्हणजेच राजकीयदृष्ट्या बरोबर नाही. ज्याला पाठित खंजीर खुपसणे म्हणजेच विश्वासघात करणे एवढाही अर्थ माहित नाही, त्यासाठी प्रोटोकॉल हा शब्द वापरला.

मी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर टिका केली असती, तर मी त्याला उत्तर देणे बरोबरीचे झाले असते. ते राजकारणातील प्रोटोकॉल धरून झाले असते. पण राऊतांच्याबाबतीत तसे नाही!

sanjay raut chandrakant patil
पहिल्यांदा राऊतांनी स्वत:ची किंमत ओळखली - निलेश राणे

मुश्रीफांची बाजू घेताना ‘पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?असा सवाल तुम्ही केलात. संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही किंबहुना तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. परंतु पीएमसी बँक घोटाळ्यावेळी ५० लाख रुपयांसाठी तुमची झालेली धावपळ बघून मी अंदाज बांधला!

जर ५० लाख रुपयांसाठी एवढा त्रास असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येईल, असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला. तुम्ही म्हणालात हसन मुश्रीफांसारख्या पैलवानामुळे कोल्हापुरातून भाजपाचा सुफडा साफ झाला वैगरे. परंतु तुम्ही विसरलात मागील विधानसभा निवडणूक शिवसेना भाजपा युतीत लढले. कोल्हापूर जिल्ह्यात ६ पैकी ५ जागांवर शिवसेना पराभूत झाली आणि एकच आमदार उरला. हे केवळ मी तुमच्या माहितीसाठी सांगितले. कारण सध्या तुम्हाला शिवसेनेचा विसर पडला असून राष्ट्रवादीची चांगली माहिती असते.

sanjay raut chandrakant patil
राऊतांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा चिमटा

संजय राऊत हे सातत्याने माझ्यावर टिका करून मला भरपूर प्रसिद्धी मिळवून देत असतात.राजकारणात ‘निगेटिव्ह पब्लिसिटी'चाही उपयोग असतो. फक्त तशी टिका योग्य ठिकाणांहून व्हावी लागते. सज्जनांनी टिका केली की धोका असतो राऊतांसारख्यांच्या टिकेचा फायदाच होतो!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()