मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची एपीआय सचिन वाझे प्रकरणी CBI चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक सविस्तर पत्र लिहून पाटील यांनी ही मागणी केली आहे. (Chandrakant Patil writes HM Amit Shah demanding CBI inquiry against Ajit Pawar and Anil Parab)
चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं की, "एपीआय सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेल्या अनेक खुलाशांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वाहतूक मंत्री अनिल परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग उघड झाला आहे. या लोकांचा मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचारात हात असल्यानं ते धक्कायदायक आणि लाजीरवाणं आहे. त्यामुळे माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे विनंती करतो की त्यांनी अजित पवार आणि अनिल परब यांच्याविरोधात CBI चौकशीचे आदेश द्यावेत."
महाराष्ट्रात राजकीय बळाचा गैरवापर सुरु असून राजकीय बदल्याच्या भावनेमुळं कायदा आणि सुव्यवस्था कोलमडून पडली आहे. मंत्र्यांकडून अत्यंत गैरमार्गांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली जात आहे. सरकारकडून खंडणी गोळा करण्यासाठी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. वाझेला मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएनं अटक केली असून ते सध्या तुरुंगात आहेत.
अजित पवार आणि दर्शन घोडावतांनी उकळली खंडणी
सचिन वाझेचा इतरही अनेक गुन्ह्यांमध्ये समावेश असून खंडणीप्रकरणी वाझेचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा झाल्याचं चौकशीतून उघड झालं आहे. त्याचबरोबर या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे झाले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्यामार्फत सचिन वाझेंना बेकायदा गुटखा निर्माते आणि विक्रेत्यांकडून १०० कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप केला आहे. याचा सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टासमोर लिखित खुलासा केल्याचं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
अनिल परबांनी वाझेमार्फत वसूल केली खंडणी
त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील सचिन वाझेला मुंबई महापालिकेतील ५० कॉन्ट्रॅक्टर्सकडून तक्रारींची धमकी देत २ कोटी रुपयांची खंडणी वसूल केली आहे. याचाही वाझेनं आपल्या लेखी जबाबात उल्लेख केला आहे, असा दावाही चंद्रकात पाटील यांनी पत्रातून केला आहे. तसेच अनिल परब यांची सैफी बुर्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (SBUT) च्या संचालकांना धमकावून ५० कोटी वसूल केल्याप्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीही पाटील यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.