'मविआची मतं फुटली नाहीत तर...'; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं विजयाचं गुपित

रात्री साडेतीन वाजता निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या सहा जागेसाठी निकाल जाहीर करण्यात आला, त्यामध्ये भाजपच्या तीनही उमेदवारांची वर्णी लागली आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSakal
Updated on

मुंबई : रात्री उशीरा राज्यसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. त्यामध्ये भाजपच्या तीनही उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर भाजपकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील तीन उमेदवारांनी बाजी मारली असून शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झाला आहे. शिवसेनेचा एक, राष्ट्रवादीचा एक आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(Chandrakant Patil On RajyaSabha Election Result)

दरम्यान मत अवैध ठरवण्याच्या आरोपावरून लांबणीवर पडलेला राज्यसभेचा निकाल रात्री साडेतीन वाजता निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामध्ये भाजपाच्या तीनही उमेदवारांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागाही जिंकणार, हे आम्ही ठामपणे सांगत होतो. आवश्यक नियोजन करून आम्ही विजय मिळवला, त्याचं श्रेय देवेंद्रजींच्या रणनीतीला." असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

Chandrakant Patil
शिवसेनेने एक जागा गमावली; संजय राऊत म्हणाले...

"मविआची मतं फुटली नाहीत, तर भाजपा अधिक विश्वासार्ह पर्याय वाटल्यानं ती आम्हाला मिळाली!" असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली असून विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. मत फुटली नसून आमदारांना भाजप अधिक विश्वासार्ह वाटला म्हणून त्यांनी आम्हाला मतदान केलं असं म्हणत चंद्रकांत पाटीलांनी भाजपच्या विजयाचं गुपित सांगितलं आहे.

दरम्यान भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला असून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि शिवसेनेचे संजय राऊत यांचा विजय झाला आहे. तर सातवे उमेदवार असलेले संजय पवार यांचा पराभव झाला. भाजपने आणि मविआने काही आमदारांच्या मतावर आक्षेप घेतल्याने निवडणुकीचा निकाल लांबला होता. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत अवैध ठरवलं होतं. त्यानंतर रात्री तीन साडेतीनच्या सुमारास हा निकाल लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()