Chandralal Meshram: राज्य मागासवर्ग आयोगातचं होईना एकमत! सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना हटवलं

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे, त्यासाठी विशेष अधिवेशनही रखडल्याचं सांगितलं जात आहे.
Chandralal Meshram
Chandralal Meshram
Updated on

मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगातच सध्या धुसफूस सुरु असल्याचं चित्र आहे. कारण यातील एक सदस्य असलेले चंद्रलाल मेश्राम यांची हाकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्याशी मतभेद झाल्यानं मेश्राम यांची हाकालपट्टी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. पण अद्याप आपल्याला असं कुठलंही अधिकृत पत्र मिळालं नसल्याचं मेश्राम यांनी म्हटलं आहे. (Chandralal Meshram Expulsion from State Backward Classes Commission as member)

Chandralal Meshram
ShivSena on Ashok Chavan: शहिदांच्या अपमानाची गॅरंटी! अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरुन शिवसेनेनं भाजपला डिवचलं

राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात नुकतंच सर्वेक्षण पार पडलं आहे. याचा अहवाल अद्याप शासनाला सादर झालेला नाही. या अहवालासाठी विशेष अधिवेशनही रखडल्याचं सांगितलं जात आहे. इतक्या महत्वाच्या टप्प्यावर आयोगाचं काम आलेलं असताना आहे. या टप्प्यावर मेश्राम यांना वगळण्यात येत असल्यानं ही गंभीर बाब आहे. (Marathi Tajya Batmya)

Chandralal Meshram
Valentine's Day : 'ती'च्या डोळ्यांनी 'तो' अनुभवतो प्रेमाचे रंग; 9 वर्षांच्या संसारात मयुरीची 'दीपक'ला डोळस साथ

मेश्राम यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, एबीपी माझानं मेश्राम यांना याप्रकरणी विचारण्या केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, "याबाबतीत माझ्याशी अद्याप काहीही चर्चा झालेली नाही. मी अध्यक्षांची भेट घेऊन त्यानंतरच मी माझी भूमिका मांडेन. एक सदस्य म्हणून माझ्यावर जी काही जबाबदारी दिली होती, ती सर्व मी पार पाडली आहे. (Latest Marathi News)

मागे मला एक नोटीस आली होती की, तुम्ही बैठकींना गैरहजर राहता. त्याचं उत्तर मी तातडीनं माझ्या हजेरीचा दाखला देऊन दिलं होतं. हा प्रश्न विधानसभेत विरोधीपक्ष नेत्यांनी उचलला होता, हे मला नंतर कळलं. त्यानंतर सरकारनं काय निर्णय घेतलाय बाबत अद्याप मला काहीही माहिती नाही"

Chandralal Meshram
Sonia Gandhi : सोनिया गांधी उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरणार? 'इथून' दाखल करणार उमेदवारी

नेमका विषय काय?

राज्यभरात जो सर्व्हे झाला आहे, त्याचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. याबाबत अध्यक्ष संदीप शुक्रे यांनी विशिष्ट भूमिका मांडल्या आहेत. तसेच काही शिफारशी देखील केल्या आहेत. पण याच्यापेक्षा मेश्राम यांची भूमिका वेगळी असल्यानं त्यांना वगळण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.