Chandrapur : मोठी बातमी! चंद्रपुरात काँग्रेसनं गमावला मोठा नेता; खासदार बाळू धानोरकर यांचं 48 व्या वर्षी निधन

दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Balu Dhanorkar Passed Away
Balu Dhanorkar Passed Awayesakal
Updated on
Summary

चंद्रपूरचे (Chandrapur) खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे आजारपणामुळं निधन (Balu Dhanorkar Passed Away) झालं.

पुणे : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (वय 48 वर्षे) यांचे 30 मे रोजी पहाटे नवी दिल्ली येथे वैद्यकीय उपचारादरम्यान निधन झाले.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून धानोरकर (Balu Dhanorkar Passed Away) 2019 मध्ये निवडून आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथे वैद्यकीय उपचार सुरू होते. नुकतेच त्यांना दिल्ली येथे वेदांचा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आणण्यात आले होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते.

त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे, आज 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर 31 मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल.

Balu Dhanorkar Passed Away
Balu Dhanorkar: खासदार धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक, पण...

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 मध्ये शिवसेनेने याच क्षेत्रातून उमेदवारी दिली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला.

Balu Dhanorkar Passed Away
Balu Dhanorkar : वडीलांच्या निधनानंतर खासदार बाळू धानोरकरांची तब्येत बिघडली; उपचारासाठी दिल्लीला नेलं जाणार

2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला. परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात शेवटच्या क्षणी कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करून विजय मिळवला.

बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार

राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले. लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला. लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका , मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरलेत.

Balu Dhanorkar Passed Away
Kolhapur : महत्वाची बातमी! कोल्हापूर, साताऱ्यातील 536 उद्योजकांना नोटिसा; MIDC नं दिला थेट इशारा

अशातच शुक्रवार, दिनांक 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांची मंगळवार 30 मे रोजी पहाटे त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.