Crime: एकतर्फी प्रेमातून युवकाचं धक्कादायक कृत्य! अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

physical abuse girl crime
physical abuse girl crime esakal
Updated on

Chandrapur News: दोघेही एकाच वॉर्डातील रहिवासी आहेत. शेजारी असल्याने लहानपणापासून दोघांमध्ये मैत्री होती. मैत्रीतून १८ वर्षीय युवकाचे १४ वर्षीय मुलीवर प्रेम जडले. मनात असलेली अनेक वर्षांपासूनची प्रेमाची इच्छा त्याने बोलून दाखवली.

मात्र, तिने प्रेमाला स्पष्ट नकार दिला. यामुळे युवकाचा राग अनावर झाला. तु मेरी नही तो, किसी की नही होने दुंगा, हा फिल्मी डायलॉग त्याने प्रत्यक्षात उतरविण्याचे ठरविले. बॉटलीमध्ये पेट्रोल घेऊन थेट तिचे घर गाठले.

physical abuse girl crime
Ashadhi Wari 2023 : गोदाघाटावर वारकऱ्यांची मांदियाळी; मंदिरात दर्शनासाठी लोटली गर्दी

अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकताना कुटुंबीयांनी धाव घेत तिची सुटका केली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत युवकाला अटक केली. सिद्धांत भेले असे अटकेतील युवकाचे नाव आहे.

भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथे घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बेलगाव येथे पीडित मुलीचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्या घराशेजारी सिद्धांत भेले याचेसुद्धा कुटुंबीय आहे.

घराशेजारी असल्याने सिद्धांत आणि पीडित अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. पीडित मुलगी वयात येत असल्याने सिद्धांतच्या मनात तिच्याविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली. यानंतर त्याने आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला.

सिद्धांतने काल संधी साधून अल्पवयीन मुलीसमोर आपल्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त केली. त्यानंतर मुलीने ठाम शब्दात त्याच्या प्रेमाला नकार दिला. त्यामुळे सिद्धांत तिने दिलेला प्रेमाचा नकार पचवू शकला नाही.

physical abuse girl crime
Ashadhi Wari : आषाढीवारीसाठी 'इतक्या' रुग्णवाहिका तैनात; 'बीव्हीजी'कडून वारकऱ्यांची अनोखी सेवा

मनात राग धरून प्रेमाला नकार दिल्याने तिला धडा शिकविण्याचा निर्णय करीत निघून गेला. काही वेळानंतर तो पेट्रोलने भरलेली बॉटल घेऊन तिचे घर गाठले. त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकले. हा प्रकार तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यामुळे तातडीने धाव घेत मुलीची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला.

या घटनेने घाबरलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

सिद्धांतला अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ जूनपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.