Lok Sabha Election 2024 : 'रेशन कार्डवर देणार ब्रँडेड दारू...', लोकसभेसाठी महिला उमेदवारांचं मतदारांना आश्वासन

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्ष काम करत आहेत.
Lok Sabha Election 2024 : 'रेशन कार्डवर देणार ब्रँडेड दारू...', लोकसभेसाठी महिला उमेदवारांचं मतदारांना आश्वासन
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्ष काम करत आहेत. यादरम्यान चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या महिला उमेदवार वनिता राऊत या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या घोषणेमुळे त्यांची चर्चा होतेय. त्यांनी केलेली घोषणा इतर उमेदवारांपेक्षा खूपच वेगळी आहे. राऊत यांनी मोफत मद्य उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मतदारांना दिले आहे. (Chandrapur Lok Sabha Election 2024)

अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत या सध्या निवडणूक प्रचार करत आहेत. त्यांनी निवडणूक जिंकून खासदार झाल्यास खासदार निधीमधून रेशन कार्डवर जसे राशन मिळते तसेच उच्च दर्जाची विस्की आणि बिअर देखील गरीबांना उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच यासोबत बेरोजगार तरुणांना दारूचे ठेके देणार असल्याचे देखील म्हटले आहे.

वनिता राऊत यांचं म्हणणं आहे की, गरीब लोकांना महागडे मद्य मिळत नाही. ते देशी दारू पिऊन कुठेही पडत राहतात. म्हणून स्वस्त किंमतीत त्यांना चांगली दारू उपलब्ध करून देऊन त्यांना आनंदी पाहण्याची माझी इच्छा आहे. आज लोक बेहिशोब मद्य पितात, ज्यामुळे त्यांची घरे उद्ध्वस्त होतात. जर या लोकांकडे लायसेंस असेल तर ते प्रमाणात मद्य सेवन करतील आणि घरे देखील बर्बाद होणार नाहीत.

Lok Sabha Election 2024 : 'रेशन कार्डवर देणार ब्रँडेड दारू...', लोकसभेसाठी महिला उमेदवारांचं मतदारांना आश्वासन
Hatkanangale Lok Sabha : ..तर मैदानात घेऊन लोळवल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा थेट इशारा

वनिता राऊत या पहिल्यांदाच निवडणूक लढवत नाहीयेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या नागपूर येथून मैदानात उतरल्या होत्या. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी चिमूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. तेव्हा देखील वनिता यांनी हेच आश्वासन दिले होते, मात्र त्यावेळी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. असे असून देखील त्या पुन्हा हाच मुद्दा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

वनिता चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील रहिवासी आहेत. येथे गाव तेथे दारूचं दुकान आणि खासदार निधीमधून गरीबांना विदेशी मद्य देण्याच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहेत. या मुद्द्यांवर त्यांना मतं मिळणार की लोक पुन्हा त्यांना नाकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Lok Sabha Election 2024 : 'रेशन कार्डवर देणार ब्रँडेड दारू...', लोकसभेसाठी महिला उमेदवारांचं मतदारांना आश्वासन
Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न...; IPLचे उदाहरण देत राहुल गांधींचा हल्लाबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.