Chandrapur Flood News : चंद्रपूर शहराला पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. शहरातील काही भागांमध्ये पाच ते सहा फूट पाणी साठल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे घरात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू केलं जात आहे. काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीमने सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
ईरई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने चंद्रपूर शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. शहरातील राज नगर, सहारा पार्क आणि परिसर पाण्याखाली गेलाय. जवळपास पाच ते सहा फूट पाणी या भागांमध्ये साठलेलं असल्याने लोक घरांच्या छतावर जावून थांबले आहेत.
चंद्रपूरमध्ये अद्याप एनडीआरएफची टीम दाखल झालेली नाही. त्यामुळे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम सुरु केलीय. चंद्रपूर शहरात अचानक पाणी साठल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. सकाळी सात वाजल्यापासून पाणी वाढायला सुरुवात झाली होती.
बॅक वॉटरमुळे चंद्रपूर शहराला पुराचा तडाखा बसल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे आणखी पाण्याची पातळी वाढण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केलाय. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी तयार राहावं, असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु काही लोक पाणी कमी होईल, या आशेने घरातच थांबलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.