Bawankule on Prakash Ambedkar: राज्यात शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या युतीनंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपसोबत असल्याचा गौफ्यस्फोट केला होता. त्यानंतर राजकारण चांगलेच पेटले आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र झाली. मात्र महाविकास आघाडीतील बाकी घटकांना हे माहित नाही. नाना पोटोले देखील बोलले त्यांना हे मान्य नाही.
महाविकास आघाडी याबाबत काही निर्णय येईल मला याबाबत काही बोलायचे नाही. कितीही किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र झाली तरी भाजपला अडचण येणार नाही. हे आमच्यासाठी नवीन नाही."
भाजपने मनुस्मृती सोडली तर भाजपसोबत जायला तयार आहे, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे संतापले. त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली.
"प्रकाश आंबेडकर इतक्या लहान डोक्याचे आहेत. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षामध्ये सर्वात जास्त आदिवासी क्षेत्रांमध्ये काम आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा स्विकार करुन त्यांना अभिप्रेत असलेले शासन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे," असे बावनकुळे म्हणाले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी अनेकवेळा तोडले. मोदींनी बाबासाहेबांच्या संविधानाच्या कुठल्याही कलमात सुधारणा केली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस समोर नेत आहेत.
हा विचार प्रकाश आंबेडकरांनी करायला हवा. तरी देखील तुम्ही व्यक्तिगत विरोधी म्हणून राजकारणासाठी अशी टीका करत असाल तर हे दुर्दैवी आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.