मुंबई : मकाऊ इथं एका कसिनोमध्ये कथितरित्या जुगार खेळतानाचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना बावनकुळे यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. (Chandrashekhar Bawankule first reaction on his images in Casino which shared by Sanjay Raut)
कुटुंबासह पर्यटनानंतर बावनकुळे महाराष्ट्रात परतले आहेत. मीडियानं त्यांना कसिनोतील फोटोबाबत विचारल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, "मी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात गेल्या ३४ वर्षांपासून आहे. मी भाजप-शिवसेनेच्या युतीत अनेक वर्षे काम केलं. शिवसेनेतील लोक मला ओळखतात, विधीमंडळात २० वर्षांपासून आमचे अनेक मित्र आहे. मंत्रिमंडळात काम केलं आहे. आमच्या मतदारसंघात आम्ही ४-४ वेळा निवडून आलो आहे"
गेल्या १४ महिन्यांपासून मी घरीच नाहीए. कधीतरी आठवड्यातून किंवा महिन्यातून मी घरी जातो. त्यामुळं माझी सून आणि मुलगी यांनी यांनी तीन दिवसांचा सहकुटुंब पर्यटनासाठी जाण्याचा प्लॅन केला. हाँगकाँग, मकाऊ या पर्यटन स्थळावर आम्ही गेलो. तिथं कुठल्याही हॉटेलांमध्ये गेलात तर कसिनोमधूनच जावं लागतं.
पण अत्यंत चांगलं सुरु असताना आमच्या कुटंबाला व्यक्तिगत त्रास दिला गेला. त्यामुळं अशा कुठल्याही प्रकारच्या फोटोच्या आधारे कोणाची इमेज तुम्हाला खराब करता येत नाही. आम्ही मोठा संघर्ष करुन ३४ वर्षे ही इमेज तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्यांना असं काहीतरी करायचं आहे त्यांना लखलाभ"
"आणि काय सांगायचं साडेतीन कोटी रुपये. एक लाख रुपये घेऊनही तुम्हाला विमानानं जाता येत नाही. पण तिथं माझे मित्र असतील, माझे बँक अकाऊंट आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मला आता असं वाटतं की कधीकाळी कोणी असे विदेशात पैसे ठेवले असतील, त्यांना प्रशिक्षण दिलं असेल, डॉलर कन्व्हर्ट करायचं अशा लोकांनाच असे आरोप सुचतात, अशा शब्दांत, अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.