विधान परिषदेतील विजयानंतर फडणवीसांना भेटताना बावनकुळे भावूक

Nagpur MLC Election Result
Nagpur MLC Election Resultsakal
Updated on

नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत (Nagpur MLC Election Result) भाजपचे चंद्रशेखर बावनुकळे (BJP Chandrashekhar Bawankule) यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी काँग्रेसचा (Congress) पाठिंबा असलेला अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांसमोर येऊन बावनकुळेंचं अभिनंदन केलं. यावेळी बावनकुळे चांगलेच भावूक झालेले पाहायला मिळाले.

Nagpur MLC Election Result
MLC Election Result : काँग्रेसने बदललेल्या उमेदवाराला मिळालं फक्त स्वतःचं मत

बावनकुळेंना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे गेल्या सरकारमध्ये ऊर्जामंत्री राहिलेले बावनकुळे गेल्या २ वर्षांपासून सत्तेच्या दूर होते. भाजपने त्यांचा पत्ता कट केल्याच्या चर्चा होत्या. मात्र, बावनकुळे पक्षात सक्रीय होते. त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वारंवार विरोधकांना धारेवर धरले. त्यानंतर भाजपने बावनकुळेंचं पुनर्वसन करत त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे त्यांना अधिकच बळ मिळाले. त्यांनी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढली. यामध्ये काँग्रेसप्रणीत अपक्ष उमेदवाराचे त्यांच्यासमोर आव्हान होते. मात्र, बावनकुळेंनी दणदणीत विजय मिळविला आहे.

नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली आहेत, तर काँग्रेसने वेळेवर पाठिंबा दिलेल्या मंगेश देशमुख यांना १८६ मते प्राप्त झाली. त्यांना फक्त १ मत म्हणजेच स्वतःच्या मतावर समाधान मानावे लागले.

फडणवीसांना मारली मिठी -

बावनकुळेंच्या एकहाती विजयानंतर फडणवीसांनी माध्यमांसमोर येऊन बावनकुळेंचं अभिनंदन केलं. मी निवडून आलो तेव्हा इतकी खुशी झाली नाही. मात्र, बावनकुळेंच्या विजयामुळे अधिक आनंद झाला असल्याचे फडणवीस म्हणाले. फडणवीस समोर दिसताच बावनकुळेंनी त्यांना जोरदार मिठी मारली. यावेळी बावनकुळेंना अश्रू अनावर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.