BRSचं आश्वासन पडलं भारी! हैदराबादला कांदा विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला अर्थिक नुकसान..

धरली हैदराबादची आशा पदरी निराशाच; कांद्याच्या पट्टीबाबत शिर्डीतील शेतकऱ्यांचा अनुभव
CHANDRASHEKHAR RAO
CHANDRASHEKHAR RAO
Updated on

शिर्डी: केसीआर सरकार कांद्याला दीड हजार रुपये क्विंटल भाव देणार, अशा अफवांवर विश्‍वास ठेवून हैद्रराबादेत कांदा घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली. राहाता तालुक्यातील रास्तापूर येथील तरुण कांदा उत्पादक योगेश वाणी व त्यांच्या सहकारी मित्रांना हा विदारक अनुभव आला.

त्यांनी तेथे नेलेल्या कांद्याच्या विक्रीतून त्यांच्या पदरी खर्च वजा जाता केवळ सहाशे ते साडेसहाशे रुपये प्रतिक्विंटल भाव पडला.

CHANDRASHEKHAR RAO
पाच हजार रुपयांसाठी जीवाची बाजी लावायची का? पोलिसपाटलांची स्थिती आरोपींकडून हल्ले करण्यापासून खुनापर्यंत मजल

सध्या महाराष्ट्रात व्यापारी शेतात जाऊन कुठलीही कपात न करता आठशे ते साडेआठशे रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करीत आहेत. मात्र अफवांवर विश्‍वास ठेवत कांदा तिकडे नेऊन मोठे अर्थिक नुकसान सोसण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली.

याबाबत ‘सकाळ’शी बोलताना वाणी म्हणाले की, महाराष्ट्रातील केसीआर यांच्या पक्षाच्या एका नेत्याची व्हिडिओ क्लीप व्हायरल झालेली आम्ही पाहिली.

हैद्राबाद येथे केसीआर सरकारने दीड हजार ते अठराशे रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करण्यास सुरवात केली, असे त्यात नमुद करण्यात आले होते. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक दिले होते. आम्ही त्यानुसार संपर्क केला. आमची खात्री पटली.

आम्ही पाच मित्रांचा मिळून अडीचशे क्विंटल कांदा घेऊन हैदराबादच्या बाजारपेठेत गेलो. मुळात ही बाजारपेठ फार छोटी आहे.

आमच्या कांद्याला केवळ नऊशे ते एक हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. महाराष्ट्रात कांद्यावर आडत नाही. तेथे सहा टक्के दराने आडत कपात झाली. आमच्या पदरात केवळ सहाशे ते साडेसहाशे रुपये क्विंटल दराने रक्कम शिल्लक राहिली.

CHANDRASHEKHAR RAO
Mumbai Crime: जीव वाचविण्यासाठी धावाधाव मात्र.. डोंबिवलीत भर रस्त्यात रिक्षाचालकाची हत्या CCTV Video

आमच्या शेतात येऊन महाराष्ट्रातील व्यापारी कुठलाही कपात न करता आठशे ते साडशे आठशे रुपये दराने कांदा खरेदी करतात. मोठे अर्थिक नुकसान आणि मनस्ताप सहन करण्याची वेळ आमच्यावर आली.

शेतकऱ्यांनी केवळ अफवांवर विश्‍वास ठेवून आपला शेतमाल परराज्यातील किंवा राज्यातील कुठल्याही महानगराच्या बाजारपेठेत नेण्यापूर्वी खात्री करून घ्यावी. आम्ही आधी फोन करून खात्री करून घेतली, तरी आमच्यावर अर्थिक नुकसान आणि मनस्ताप सोसण्याची वेळ आली.

- योगेश वाणी, कांदा उत्पादक, रास्तापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.