अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा; पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तुम्ही काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही, हे दाखवून द्या, असं आवाहनही गोपीचंद पडळकरांनी केलं आहे.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarEsakal
Updated on

अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. हे आवाहन करताना त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. तुम्ही काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही, हे दाखवून द्या, असंही पडळकर म्हणाले. दोन ते तीन दिवसांपूर्वीच अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी आणि पडळकर आमनेसामने आले होते. त्यानंतर हे आवाहन करण्यात आलं आहे. (Gopichand Padalkar requests to change the name of Ahmednagar to Ahilyanagar)

याबद्दल बोलताना पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, "जेव्हा हिंदुस्तानातल्या मुसलमान राजवटीत हिंदू संस्कृती, मंदिरं फोडली जात होती, तेव्हा हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी याच हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, मंदिरांचा जिर्णोद्धार केला. म्हणून सर्व अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की, ज्या भूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर असे करावे, असं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. या शहराचं नामांतराचा तात्काळ निर्णय़ घेऊन तुम्ही दाखवून द्या की तुम्ही काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सन्मान करा. ही आपल्याकडून अपेक्षा आहे".

Letter by Gopichand Padalkar
Letter by Gopichand PadalkarSakal

शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करताना गोपीचंद पडळकर पत्रात म्हणतात, "नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगरमधल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे येण्यापासून रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्या बहिणीचे आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लाँच कऱण्याचा इव्हेंट वाटतो."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.