Chhagan Bhujbal : 'अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं, हीच शरद पवारांना गुरुदक्षिणा'

NCP Update : थोड्यावेळापूर्वी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला हा निर्णय का घ्यावा लागला याविषयी सांगितले आहे.
Chhagan Bhujbal Ajit Pawar deputy chief minister
Chhagan Bhujbal Ajit Pawar deputy chief ministeresakal
Updated on

Chhagan Bhujbal Ajit Pawar deputy chief minister : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता पत्रकार परिषद घेण्याचा सपाटा लावला आहे. काल पासून पवार काका-पुतणे यांनी अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार कधी काय करतील याचा भरवसा नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. अशावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याविषयी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील माहिती नव्हते असे दिसून आले आहे.

थोड्यावेळापूर्वी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला हा निर्णय का घ्यावा लागला याविषयी सांगितले आहे.मुळातच आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आमदार आणि खासदारांचा पाठींबा आहे. अशावेळी आमच्याकडे पक्ष आणि पक्षचिन्ह आहे. लोकशाहीमध्ये बहुमतानं सगळ्या गोष्टी होतात. कुणाच्या सांगण्यावरून नाही. गेल्या दोन दिवसांपासून जे काही चाललं आहे त्यात आमच्याविरोधात बोलणं याला काही अर्थ नाही.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

येत्या काळात आम्ही कार्यकर्ते आणि आमदार यांना कोणत्याही प्रकारे घटनात्मक आणि कायदेशीर संरक्षण कसे करता येईल याचा विचार करणार आहोत. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण आणि बेरजेचे राजकारण करण्यावर आपण भर देणार असल्याची भूमिका यावेळी अजित पवार यांनी मांडली. मात्र यासगळ्यात छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतले आहे.

छगन भुजबळ यांनी आपण अजित पवारांना उपमुख्यमंत्री करुन शरद पवारांनी गुरुपौर्णिमेची मोठी भेट दिली आहे. अशी प्रतिक्रिया देत अनेकांना धक्का दिला आहे. यापूर्वी असाच प्रश्न हा प्रफुल पटेल यांनाही विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी पवार हे आमचे दैवत आणि ते आम्हाला गुरु समान असून त्यांचा आशीर्वाद हा नेहमीच आमच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

Chhagan Bhujbal Ajit Pawar deputy chief minister
Pune : लोहगडावर पर्यटकांची गर्दी! लोकं 4 तास महादरवाज्यात अडकले; Video होतोय Viral

यावेळी प्रफुल पटेल यांनी सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड केली तर प्रवक्ते म्हणून आमदार अमोल मिटकरी यांची निवड करण्यात आली आहे. युवा नेतेपदी सुरज चव्हाण तर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal Ajit Pawar deputy chief minister
Praful Patel On Sharad Pawar : गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवारांची भेट घेणार का? 'आता...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.