Chhagan Bhujbal: "आमदारांची घरं पेटवली, ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेलं देखील पेटवली.. "ऑडिओ क्लिपवर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण

छगन भुजबळांनी त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) आमदार व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप काल (रविवारी) व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमधील आवाज छगन भुजबळांचाच असल्याचं बोललं जात होतं. काल ही ऑडिओ क्लिप राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती, या ऑडिओ क्लिपमध्ये छगन भुजबळांनी थेट 'ओबीसी काही वाचणार नाही आता', असं म्हटलं होतं. आता छगन भुजबळांनी त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाले होते छगन भुजबळ?

या ऑडिओ क्लिपमध्ये छगन भुजबळ दुसऱ्या एका व्यक्तीशी फोनवर बोलत आहेत. यावेळी बोलताना समोरची व्यक्ती छगन भुजबळ यांच्यासोबत असल्याचे सांगते, “ही सगळी मंडळी आली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतोच आहे की आता आवाज उठवा.

एकतर आपण कुठपर्यंत लढणार. गावागावात त्यांचे बुलडोझर चालतायत. त्यात ओबीसी काही वाचणार नाही आता. त्यामुळे आता करेंगे या मरेंगे. हेच सगळ्यांनी करायला पाहिजे. असंही मरतंय, तसंही मरतंय. दुसरं काय. त्यांचं सगळं झालं. मी उभा राहतोय”, असं भुजबळ या क्लिपमध्ये पुढे म्हणताना ऐकू येत आहे.

Chhagan Bhujbal
Weather Update: पुन्हा रेनकोट, छत्र्या बाहेर काढा; कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, काय आहे हवामान विभागाचा अंदाज

छगन भुजबळांचं स्पष्टीकरण

चर्चेत आलेल्या या ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण दिलं आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळांनी म्हटलं की, "सगळीकडे ओबीसी आरक्षणावर आक्रमण चालू आहे. आमदारांची घरं पेटवली जात आहेत.ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेलं देखील पेटवली जात आहेत. यासंदर्भात आपण कुणीतरी बोललं पाहिजे. ते एका आवाजात बोललं पाहिजे. जसं इतर लोक त्यांच्या समाजाला आवाहन करू शकतात, तसंच मीही ओबीसींमधल्या ३७५ जातींना आवाहन करू शकतो की, आपणही आपलं दु:ख एकमुखानं मांडलं पाहिजे", असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal
Accident News: दिवसभर शेतात राबल्या, घरी जात असताना कारची धडक अन्... तीन शेतमजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू

छगन भुजबळ आज बीडमध्ये

छगन भुजबळ आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे बीडचे जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी सुभाष राऊत यांचं सनराईज हे हॉटेल मराठा आंदोलकांनी पेटवलं होतं. छगन भुजबळ हे आजराऊत यांची भेट घेणार आहेत. तसेच त्या हॉटेलची पाहणी करणार आहेत. त्याचसोबत बीड शहरात झालेल्या हिंसाचारात जयदत्त क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांचं घर आंदोलकांनी पेटवून दिलं होत. या दोन्ही नेत्यांच्या घरांनाही भुजबळ भेट देणार आहेत.

Chhagan Bhujbal
Gram Panchayat Election: राज्यभरातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींचे 'कारभारी' आज ठरणार, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; पुणे जिल्ह्याकडे राज्याचं लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()