Chhagan Bhujbal Clarification: 'सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याच काम...', छगन भुजबळांचं ‘त्या’ आरोपावर स्पष्टीकरण

Chhagan Bhujbal Clarification: छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा फोटो दाखवून मतं मागा या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हटलं आहे वाचा सविस्तर
Chhagan Bhujbal Clarification
Chhagan Bhujbal ClarificationEsakal
Updated on

Chhagan Bhujbal Clarification: शरद पवारांचे फोटो दाखवून मते मिळवा असं मी कधीच म्हटलं नाही. त्यांच्यासोबत असतानाही मी कधी त्यांचा फोटो दाखवा आणि मते मिळवा असं बोललेलो नाही. चिन्हावर मतं घ्या असं सांगतो. घड्याळ चिन्ह आता आम्हाला मिळालं आहे. ते निवडणूक आयोगाने दिले आहे. आता ती वेळही आलेली नाही की, चिन्ह दाखवून प्रचार करावा. कारण अद्याप कोणत्याही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे दिशाभूल करण्याचे काम शरद पवार गटाकडून होत आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मी त्यांचा फोटो कुठे वापरला आहे ते दाखवा. मी त्यांचा फोटो किंवा चिन्ह दाखवून मते मागितलेली नाहीत. वकिल मनु सिंघवी यांना शरद पवार गटाने चुकीची माहिती दिली आहे, असंही पुढे ते म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal Clarification
Central Government ULLAS: केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात नवसाक्षरांची रविवारी लेखी परीक्षा!

मी आत्तापर्यंत कधीच त्यांचा फोटो आणि चिन्ह दाखवून मते मागितलेली नाहीत. कारण, अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. चिन्ह तर आम्हाला निवडणूक आयोगाने दिले आहे. मी आत्तापर्यंत कधीच असं म्हटलं नाही. त्याचबरोबर छगन भुजबळ हे नाव प्रकर्षाने वृत्तपत्रांमध्ये झळकलं, छगन भुजबळ असं म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये शरद पवारांचा फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मते मिळवा. पण, असं मी कुठेही बोललो नाही. निवडणूक आली तरी मी फोटो पाहून मते द्या असं कधीच म्हणणार नाही, असंही ते म्हणालेत.

पवारांच्या नावावरून सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले

अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा यावेळी शरद पवार गटाने केला. शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरु नका, असे अजित पवार गटाला सागंतिले आहे.

Chhagan Bhujbal Clarification
Pune ISIS Terrorism Module Case: दोन राज्यात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला पुण्यात; NIA तपासात धक्कादायक माहिती समोर

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी काय घडलं?

शरद पवार गटाकडून वकील मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार गट शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात. ही फसवणूक आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो, असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू असताना शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे शरद पवार यांचा फोटो वापरलेले पोस्टर्स देखील दाखवले.

"ग्रामीण भागात घड्याळ हे चिन्ह प्रसिद्ध आहे. छगन भुजबळ म्हणतात, ग्रामीण भागात हे पोस्टर्स कायम ठेवा कारण आजही शरद पवार यांची लोकप्रियता कायम आहे, असे म्हणत त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे" असा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.

Chhagan Bhujbal Clarification
वेश्या व्यवसायातील 11 महिला-मुलींची सुटका! ग्रामीण पोलिसांचे ‘या’ ठिकाणे छापे; पीडितांमध्ये ठाणे, मुंबईसह पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील मुली

सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि चिन्ह वापरणार नाहीत असं लेखी द्या, असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत. यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार 18 मार्च रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.