मी मंत्रिपदाची शपथ घेतल्याचं लोकांना पचत नाही, भुजबळांचा विरोधकांना टोला
पुणे : राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi Government) सरकार येत्या मार्च महिन्यात पडणार असून मार्च महिन्यातच राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार येईल, असं भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं होतं. त्यावरूनच आता छगन भुजबळांनी (Maharashtra Minister Chhagan Bhujbal) राणेंना टोला लगावला आहे. अनेकजण सरकार जाईल, असं म्हणतात. पण, आमचं सरकार पाच वर्ष काम करेल, असं भुजबळ म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
मुख्यमंत्रिपद येते आणि जाते. मात्र, लोकांसाठी जो लढतो आणि बोलतो तो व्यक्ती लोकांच्या लक्षात राहतो. आज दोन वर्षांपूर्वी मी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, अजूनही हे काही लोकांना पचत नाही. काही जण म्हणतात महाविकास आघाडीचे सरकार फेब्रुवारीमध्ये जाईल, काही म्हणतात जूनमध्ये जाईल. पण, महाविकास आघाडीचे सरकार पूर्ण पाच वर्ष सत्तेत काम करेल आणि त्यानंतर पुन्हा निवडून येईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्याबाबत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यानुसार इमारतीसमोर पुतळा बसविणे उत्तम ठरणार असून ३ जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा 12 फुटाचा पुतळा मुख्य इमारतीच्या समोर उभा राहील. आज त्याचे भूमिपूजन करणार आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
सरकार पाडण्याबाबत नारायण राणे नेमकं काय बोलले? -
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे आयुष्य जास्त नाही. एखादे सरकार पाडून नवे सरकार आणायचे असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल, असं नारायण राणे जयपूर येथे बोलले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.