महाराष्ट्र बातम्या
Chhagan Bhujbal Hanuman Chalisa: भाषणावेळी सुरू झाली हनुमान चालीसा अन् भुजबळ म्हणाले, "पोलिस इन्सपेक्टर..." Video Viral
Hanuman Chalisa Video: हनुमान चालीसाचा आवाज कमी झाला. त्यावेळी भुजबळ यांनी मंदिर प्रशासनाचे आभार मानल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यात एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या भाषणावेळी हनुमान चालीसा सुरू झाल्याचे दिसत आहे.
छगन भुजबळ यांचे भाषण सुरू होते आणि त्यावेळी हुनमान चालीसा सुरू झाली. त्यानंतर भुजबळ यांनी पोलिस इन्सपेक्टर यांचे माईकवरच नाव पुकारत आवाज कमी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर हनुमान चालीसाचा आवाज कमी झाला. त्यावेळी भुजबळ यांनी मंदिर प्रशासनाचे आभार मानल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.