महाविकास आघाडी (mahaviskas aghadi) मधील घटक पक्ष काँग्रेसने (congress) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान या घडामोडींवर खास शैलीत उत्तर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं.
चर्चा करून कोणा सोबत जायचं ते बघू, भुजबळ म्हणतात...
सत्तेत आल्यापासूनच काँग्रेसकडून स्वबळावर लढण्याबाबतची घोषणा करण्यात येत होती. आता एक परिपत्रक जारी करुन काँग्रेसनं निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. यावर भुजबळ म्हणतात.. कुणाला वाटत असेल स्वबळावर जावं तर तो त्यांचा प्रश्न. नाही झालं तर निवडणुकीनंतर एकत्र येता येईल मविआ चे सर्वोच्च नेते यांच मत एकत्र निवडणूक लढण्याचं आहे. मात्र काही पक्ष सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. आम्ही स्थानिक नेत्यांना बैठक घेऊन तयारी करण्याच्या सूचना केल्या. सगळे मतदार संघ लढवण्याच्या दृष्टीने आपली तयारी पाहिजे अशा सुचना आम्ही दिल्या. मविआ चे जे पक्ष सन्मानाने आमच्या सोबत बसतील आणि चर्चा करतील त्यांच्याशी चर्चा करून कोणा सोबत जायचं ते बघू असं खास शैलीत उत्तर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं.
शिवसेनेशी युती? काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेला एकनाथ शिंदेचे नाव घेत भुजबळांचं उत्तर
आम्ही आमचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. एकनाथ शिंदे यांनी देखील एकत्र लढण्याबाबत विचारणा केली. आम्ही आमची तयारी असल्याचे सांगितले. सगळीकडे तयारी करून गरजेचं आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.