Chhagan Bhujbal : ''हिंमत असेल तर मंडल आयोगाच्या विरोधात आवाज द्या'', छगन भुजबळांचं जरांगेंना थेट चॅलेंज

राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी २६ जानेवारी रोजी एक अधिसूचना काढली. त्यानंतर मराठा समाजाने राज्यभरात विजयी जल्लोष साजरा केला. ओबीसी नेत्यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची भाषा केली आहे.
Chhagan Bhujbal on manoj jarange patil
Chhagan Bhujbal on manoj jarange patilesakal
Updated on

मुंबईः राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी २६ जानेवारी रोजी एक अधिसूचना काढली. त्यानंतर मराठा समाजाने राज्यभरात विजयी जल्लोष साजरा केला. ओबीसी नेत्यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची भाषा केली आहे.

ओबीसी नेत्यांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाला कोर्टात चॅलेंज करण्याचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली.

बुधवारी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन लाखो लोकांना बॅकडोअर एण्ट्री दिली जात आहे. पुन्हा त्यांचं सगेसोयऱ्यांच सुरु झालं आहे. त्यामुळे आम्हाला आमदार, खासदार, प्रशासन आणि कोर्टाकडे दाद मागावी लागणार आहे. लोकशाहीने आम्हाला जे अधिकार दिले आहेत, त्याचा आम्ही वापर करणार आहोत.

Chhagan Bhujbal on manoj jarange patil
Loksabha Election 2024 : सोनिया गांधी 'या' राज्यातून लढणार लोकसभा निवडणूक?, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

भुजबळ पुढे म्हणाले, त्यांच्याएवढा (मनोज जरांगे) ज्ञानी हिंदुस्थानात दुसरा कोणी आहे का? तीन कोटी लोक मुंबईत आणणार होते.. बघितले सगळ्यांनी वाशीमध्ये. ज्याला लाख म्हणजे काय अन् कोटी म्हणजे काय, हे कळत नाही. तेच आता देशामध्ये मंडल आयोगाला विरोध करणार आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोगाच्या विरोधात आवाज द्यावा, माझं त्यांना आव्हान आहे.

''मराठा समाजाचे जे माहितीगार आहेत, अभ्यासक आहेत.. ते म्हणतायत की, आम्हाला मराठा म्हणून वेगळं आरक्षण द्या. परंतु सध्या झुंडशाहीपुढे नमतं घेऊन निर्णय घेतले जात आहेत. आमच्या आरक्षणाला धक्का लागला जावू नये. ते एका जातीसाठी लढत आहेत, मी मात्र ३७४ जातींसाठी लढत आहे.''

Chhagan Bhujbal on manoj jarange patil
National Highway : 'या' नव्या राष्ट्रीय महामार्गामुळं महापुराचा धोका; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

शेवटी भुजबळ म्हणाले, गावागावात तीन-चार दिवसांपासून उन्मादी उत्सव सुरु आहे. जिथे ओबीसी घरं आहेत तिथे त्यांना त्रास दिला जात आहे. जिथे दोन-चार घरं आहेत, एखादं घर आहे ते गावं सोडत आहेत. उत्सव साजरा करा पण ओबीसींविरोधात उन्मादी उत्सव करणं चुकीचं आहे. मला वाटतंय परिस्थिती चिघळत चालली आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.