ईडीच्या धाकापोटीच अनेकजण सेनेतून भाजपात गेले, भुजबळांचा टोला

... त्यामुळे ही संघटना संपावी, माझ्यासह कोणालाही वाटत नाही - भुजबळ
Chhagan Bhujbal in Nashik | Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal in Nashik | Chhagan Bhujbal News
Updated on
Summary

... त्यामुळे ही संघटना संपावी, माझ्यासह कोणालाही वाटत नाही - भुजबळ

हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) टिकावी, अशी प्रामाणिक इच्छा आहे. मात्र अनेकजण ईडीच्या धाकापोटीच भाजपसोबत (BJP) गेले आहेत. शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो. नाशिकमधील अनेक शिवसेनेच्या शाखांचे मी उद्‌घाटन केले. अनेक आमदारांना मी शाखाप्रमुख म्हणून नेमले आहे. त्यामुळे ही संघटना संपावी, असे माझ्यासह कोणालाही वाटत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. (Chhagan Bhujbal in Nashik)

येवला दौऱ्यावर असताना भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपसोबत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सत्ता स्थापन केली असून, पूर्ण काळ यांचे सरकार टिकेल का, यावर ते म्हणाले, लग्न झाल्यावर आपण लगेच घटस्फोट घ्या, असे म्हणत नाही. त्यामुळे 'नांदा सौख्यभरे' अशा शुभेच्छा मी देतो, आशा मिश्कील शब्दात त्यांनी भूमिका मांडली. राज्यात नवीन स्थापन झालेल्या सरकारने जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सेनेत काही मतभेद असू शकतील. मात्र संघटना संपावी असे कोणालाही वाटत नाही, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

Chhagan Bhujbal in Nashik | Chhagan Bhujbal News
नाव बदलून काय साध्य केलं, अबू आझमी का राहिले तटस्थ?

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकांनी लवकरात लवकर शेतकरी कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, तसेच शेतकऱ्यांना बियाणे, खतवाटप करताना अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना बियाणे, खत खरेदी करताना इतर वस्तू खरेदी करण्याची सक्ती होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. विक्रेता सक्ती करीत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

दरम्यान, भुजबळ यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटणार का असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह बंडखोर आमदरांवर अप्रत्यक्षरित्या केलेल्या या टीकेमुळे भाजप आता यावर प्रतित्त्युर देणार का पहावे लागणार आहे.

Chhagan Bhujbal in Nashik | Chhagan Bhujbal News
पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार, हवामान खात्याचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.