Nawab Malik Latest Update: नवाब मलिक कोणत्या गटात जाणार?, छगन भुजबळांनी दिला 'हा' सल्ला

Nawab Malik  News
Nawab Malik NewsSakal
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. आज मलिक तरुंगातून बाहेर येतील. त्यापूर्वी छगन भुजबळांनी मलिकांना एक सल्ला दिला आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. मलिक साधारण १७ महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. मंत्री असतांनाच त्यांच्यावर कारवाई झालेली होती. त्यानंतर राज्यात शिवसेनेत बंड झालं अन् महाविकासआघाडी सरकार कोसळलं.

Nawab Malik  News
Homeguard Medals : महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पाच पदके जाहीर

२ जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करुन सत्तापक्षाला समर्थन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे. शरद पवारांनी हे आव्हान स्वीकारत पुन्हा राज्यव्यापी दौरा सुरु केलाय. त्यातच नवाब मलिकांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे मलिक कोणत्या गटामध्ये जातात, हा प्रश्न अनेकांना पडतोय.

मंत्री छगन भुजबळ यांनी त्यावर बोलतांना सांगितलं की, नवाब मलिक कोणत्या गटात जातात, यापेक्षा त्यांनी आधी हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. तिथे त्यांनी आजारावर लक्ष केंद्रीत करुन चांगले उपचार घ्यावेत आणि यशावकाश निर्णय घ्यावा, असा सल्ला भुजबळांनी दिला.

Nawab Malik  News
NEET परीक्षा राज्यातून लवकरच हद्दपार; बाप-लेकाच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांची ग्वाही

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील गुप्त बैठकीबाबत भुजबळ म्हणाले की, राजकीय मतभेत असू शकतात, कौटुंबिक मतभेद पाहिजेतच असं नाही. त्यामुळेच पवार साहेब पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमालाही गेले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामाजिक कार्यात एकत्र आलेलो आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं. लोकशाहीत कुणी इकडे असतं तर कुणी तिकडे असतं. तेवढं स्वातंत्र्य तर आहेच, असं त्यांनी भुजबळांनी सांगितलं.(Latest Marathi News)

संजय राऊतांनी काल बोलताना शरद पवारांमुळे आघाडीत संभ्रम निर्माण होतोय, असं विधान केलं होतं. त्यावर भुजबळ म्हणाले, संजय राऊत हे पवार साहेबांच्या जवळचे आहेत. त्यांनी मीडियात असं बोलण्याऐवजी पवार साहेबांना जावून भेटावं, त्यांना सांगावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.