Chhagan Bhujbal: महायुती टिकणार का? भुजबळांच्या 'त्या' विधानाने ओढावली सेना-भाजपची नाराजी

Mahayuti: यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ चार जागाच मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेकांमध्ये नाराजी होती.
Chhagan Bhujbal|Mahayuti
Chhagan Bhujbal|MahayutiEsakal
Updated on

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. आजही राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे अनिश्चित आहे. लोकसभा निवडणुकीचा निकालही लागला नाही त्याच्याआधीच महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपाबाबत दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. यातून महायुतीलील पक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभेपर्यंत महायुती टिकणार की नाही? अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे.

काय म्हणाले भुजबळ?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतेच मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात लोकसभेला कमी जागा मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. पण, विधानसभेला असे चालणार नाही म्हणत भुजबळांनी 90 जागांची मागणी केली.

भुजबळ यांनी केलेल्या या मागणीमुळे महायुतीत आधीपासून असलेले भाजप आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे महायुतीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

Chhagan Bhujbal|Mahayuti
Exit Poll: एक्झिट पोल अन् ओपिनियन पोल मध्ये काय आहे फरक? तुमचाही होतो गोंधळ? जाणून घ्या सर्वकाही

संजय शिरसाटांचे सणसणीत आरोप

छगन भुजबळ यांच्या या 90 जागांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आरोप केला की, भुजबळांना अशा प्रकारची विधाने करत महायुतीमध्ये तेढ निर्माण करायचा आहे.

पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, 'युतीच्या अटी लक्षात ठेवा. जागावाटपांबाबत युतीचे सर्व वरिष्ठ नेते निर्णय घेतील. बाहेर असे विधान करून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे? याचाच अर्थ युतीत तेढ निर्माण करायचा आहे. राष्ट्रवादीला एवढी घाई का? आणखी ४ महिने बाकी आहेत. निवडणुका आल्या की बघू. या विषयावर आज भांडणे योग्य नाही, लोकसभेचे निकाल येऊ द्या. एकत्र राहायचे असेल तर एकमेकांना समजून घेऊन पुढे जायला हवे. कोण किती जागांवर लढणार हे एकनाथ शिंदे ठरवतील.

Chhagan Bhujbal|Mahayuti
Dindori Lok Sabha Constituency : कांदामय निवडणूकीचा कौल अधांतरी; 75 टक्के मतदान कोणाच्या पथ्यावर

गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांच्यासह अनेकांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ चार जागाच मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेकांमध्ये नाराजी होती.

आता पुढील चार पाच महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रावादीने जास्त जागा मिळवण्यासाठी दबावतंत्र सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. पण यामुळे महायुतीमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.