Chhagan Bhujbal: "शरद पवारही मला स्क्रीप्ट देऊ शकत नाहीत, माझं स्क्रीप्ट..."; भुजबळांचं रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर

जरांगेंच्या सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला भुजबळांचा विरोध आहे. यावरुन रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती.
Chhagan Bhujbal Lakshmipuri Police Maratha Community
Chhagan Bhujbal Lakshmipuri Police Maratha Communityesakal
Updated on

मुंबई : जरांगेंच्या सरसकट मराठा समाजाला ओबीसून आरक्षणाला भुजबळांचा विरोध आहे. यावरुन रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. भुजबळांना स्क्रीप्ट कोण देतंय ते पहावं लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाला आता भुजबळांनी उत्तर दिलं आहे. (Chhagan Bhujbal says even Sharad Pawar cant give me script my script reply to Rohit Pawar allegations)

Chhagan Bhujbal Lakshmipuri Police Maratha Community
Ashish Jadhav: कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून फरार! पोलिसांना चकवा देऊन पळाल्यानं खळबळ

वड्डेटीवारांच्या भूमिकेवर केलं भाष्य

"मी महाराष्ट्रात सगळीकडं एकटा जाऊ शकत नाही. पण इतर जे ओबीसी नेते आहेत त्यांनी कुठल्याही पक्षात असलं तरी ओबीसी आरक्षण बचावसाठी काम करत राहावं. हे आंदोलन राज्यभर चालू ठेवा. आमची मोट सुटलेली नाही. (Latest Marathi News)

अडचणी काहीही असू शकतात त्यामुळं काही नेते जातील-येतील, मला याबद्दल रोष नाही. कुठल्याही पक्षात राहा पण ओबीसींसाठी लढा. माझ्या विरोधात लढलात तरी ओबीसींसाठी बोला," असं आवाहन भुजबळांनी केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Chhagan Bhujbal Lakshmipuri Police Maratha Community
David Warner: डेव्हिड वॉर्नरनं मागितली भारतीयांची माफी; काय घडलंय असं? जाणून घ्या

रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर

भुजबळांना फडणवीसांनी स्क्रीप्ट लिहून दिलीए, त्यांच्यावर दबाव आहे. या रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना भुजबळ म्हणाले, "मला कोणीही स्क्रीप्ट देऊ शकत नाही हे आत्तापर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे.

ना शरद पवारांनी कधी दिलं, ना अजित पवारांनी दिलं, ना फडणवीस देतात, ना शिंदे देतात. ३५ वर्षापासून मी जे काम हातात घेतलं आहे. त्यानुसार, माझं स्क्रीप्ट छ्त्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचं स्क्रीप्ट आहे. मंडल आयोगाचं आणि इथल्या ओबीसी, बहुजन समाजाचं माझं स्क्रीप्ट आहे," असं भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal Lakshmipuri Police Maratha Community
Video: भारताकडं निघालेलं जहाज येमेनच्या हुती बंडखोरांकडून हायजॅक! थरारक व्हिडिओ केला शेअर

जरांगेंचं स्वागत करतो, गावबंदी करणार नाही- भुजबळ

मनोज जरांगेंच्या सभांबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, "आपल्याकडं लोकशाही आहे कोणालाही कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे. त्यांचं स्वागत आहे, माझ्या शुभेच्छा आहे. मी काही इतर कार्यकर्त्यांसारखं गावबंदी करत नाही. प्रत्येकानं आपापली मतं मांडावीत. लोकांना जी मतं पटतील त्याबाजून लोकं जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.