Chhagan Bhujbal: छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? भुजबळांनी स्पष्टच सांगितले...

NCP: गेल्या जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर छगन भुजबळांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
Chhagan Bhujbal  Eknath Shinde Shiv Sena
Chhagan Bhujbal Eknath Shinde Shiv Sena Esakal
Updated on

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आहे. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असलेले छगन भुजबळ शिवसेनेत परतणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

गेल्या जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर छगन भुजबळांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे भुजबळ अस्वस्थ दिसत आहेत. त्यामुळे अनेजन सतत अंदाज लावत आहेत की, भुजबळ अजित पवारांना सोडणार आहेत.

दरम्यान नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्याची छगन भुजबळ यांची ईच्छा होती. मात्र, महायुतीमध्ये ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटल्याने त्यांनी माघार घेतली होती. पुढे प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर जाण्यासाठीही भुजबळ उत्सुक होते मात्र, तेथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पक्षाने संधी दिली होती.

Chhagan Bhujbal  Eknath Shinde Shiv Sena
Vasai Murder: ८ जूनलाही आरतीला केली होती रोहितने मारहाण, मात्र पोलीसांनी केली नाही अटक

भुजबळांचे स्पष्टीकरण

दरम्यान छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, " मी विरोधी पक्षात असलेल्या कोणत्याही नेत्याला भेटलेलो नाही. याबाबतची सर्व माहिती आमचे नेते अजित पवार यांना आहे. 10 जूनला आमचा वर्धापन दिन झाला तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे दुसरे कोणाला भेटण्याचा प्रश्नच येत नाही."

Chhagan Bhujbal  Eknath Shinde Shiv Sena
Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, दोन जण गंभीर

दरम्यान राज्यात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. यामध्ये छगन भुजबळ यांचा ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यामुळे आराठा आरक्षणाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्या सतत शाब्दिक वाद होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.