Chhagan Bhujbal: भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! पत्रातून मिळाला सावध राहण्याचा इशारा

भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणीही त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
Updated on

मुंबई : छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांच्या नाशिक येथील कार्यालयात पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. यानंतर भुजबळांची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. (Chhagan Bhujbal threat to kill again from letter warned to be careful)

Chhagan Bhujbal
Nirbhay Bano: पुण्यात 'निर्भय बनो' सभेदरम्यान काँग्रेस अन् भाजप कार्यकर्ते आमनेसामने; पोलिसांनी निखिल वागळेंना सरोदेंच्या घरीच थांबवलं

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात एक पत्र आलं आहे. त्यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती देणारं हे पत्र आहे. या पत्रात म्हटलं आहे की, "साहेब तुम्हाला उडवण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर-दिंडोरी-चांदशी इथं हॉटेलमध्ये थांबले आहेत. या लोकांनी तुम्हाला उडवण्याची ५० लाखांची सुपारी घेतली आहे. (Latest Maharashtra News)

या गुंडांपासून सावध राहा, हे ५ जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत. सागर हॉटेलसमोर यांची मिटिंग झाली आहे. साहेब सावध राहा" असा मजकूर या पत्रात हातानं लिहिलेला आहे.

Chhagan Bhujbal
Bharat Ratna Award: "दलित व्यक्तीमत्वांकडं दुर्लक्ष नको, कांशीराम यांनाही भारतरत्न द्या"; मायावतींची सरकारकडं मागणी

छगन भुजबळ सध्या राज्यात चर्चेचा विषय आहेत. कारण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश झाल्यास ओबीसींमधील इतर जातींचा आरक्षणाचे फायदे मिळणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यातूनच मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहेत. यापूर्वी देखील भुजबळ यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी आली होती. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()