नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र भुजबळांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. स्वतः त्यांनीच काल पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. दरम्यान छगन भुजबळ यांच्या माघारी नंतर महायुतीचा तिढा सुटल्याची माहिती आहे. आज राज्यातील भाजपची शेवटची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
उत्तर पश्चिम मुंबई,कल्याण, ठाणे,नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर शिवसेना शिंदे गटाला जाणार असल्याची माहिती आहे. तर भाजपला पालघर, उत्तर मध्य मुंबई तसेच दक्षिण मुंबई भाजपला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला फक्त चार जागेवर समाधान मानावं लागणार आहे. जानकर यांना एक जागा अजित पवार गटाने दिली त्याऐवजी त्यांना एक विधान परिषद जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मी नाशिकमधून लढावं, असं मोदी-शाहांनी सुचवलं होतं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र मी नाशिकमधून लढणार नाही, मी माघार घेतली आहे. नाशिकमध्ये मराठा समाजाचे लोक माझ्यासोबत होतो. पाच वर्षांमध्ये जी कामं झाली आहेत त्यामुळे त्यांनी मला समर्थन दिलं होतं. परंतु मी माघार घेत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
भूमिका स्पष्ट करताना छगन भुजबळ म्हणाले की, होळीच्या दिवशी अजितदादांचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो होतो. त्यांनी दिल्लीचा निरोप दिला. गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीमध्ये नाशिकच्या जागेची चर्चा सुरु झाली तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळांसाठी जागा मागितली. परंतु अमित शाह यांनी माझं (छगन भुजबळ) नाव पुढे केलं, असंही भूजबळ पुढे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.