Death threat to Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी! राजकीय वर्तुळात खळबळ

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

Death threat to Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे . यादरम्यान अजित पवारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा फोनवरून केला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली असून घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. या संबंधीचे वृत्त साम टीव्हीने दिलं आहे.

पुण्यात दौऱ्यावर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास धमकीचा फोन आला. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray : 'बाळासाहेबांच्या पोटी नालायक मुलगा जन्माला आलाय…'; शिंदे गटातील नेत्याची ठाकरेंवर बोचरी टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.