Chhatrapti Sambhajinagar : महाराष्ट्रातली सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे औरंगाबाद शहरानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदलले जाणार असून आता संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव हे छत्रपती संभाजीनगर करण्यात येणार आहे. याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव आता धाराशिव करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने नुकतेच औरंगाबादचे नाव हे छत्रपती संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती. मात्र शहर आणि जिल्हा असे नामांतर करण्यात अडचणी येत होत्या. या अडचणींवर आता तोडगा निघाला असून शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. असे वृत्त 'साम' वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आज तब्बल सात वर्षांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशावेळी या बैठकीमध्ये नक्की कोणकोणत्या घोषणा केल्या जातात? याबाबत सगळेच उत्सुक आहेत. यातच आता संपूर्ण जिल्ह्याचे नाव हे छत्रपती संभाजीनगर केले जाणार असून आज त्याच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार असल्याचे वृत्त 'साम'वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही मंत्रिमंडळ बैठक खूप महत्त्वाची आहे. या बैठकीमध्ये दुष्काळा संधर्बात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन संभाजीनगरमध्ये उपस्थित आहेत. यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरणा बरोबरच अजून कोणकोणते निर्णय या बैठकीमध्ये होतात ? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.