मालवण : राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatrapati Shivaji Maharaj Collapse Statue) शिल्पकार जयदीप आपटे (Sculptor Jaideep Apte) आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक आदी गंभीर कलमे लावत येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहायक अभियंता अजित जनकराज पाटील यांच्या तक्रारीवरून सोमवारी (ता. २६) रात्री उशिरा पोलिसांनी (Malvan Police) ही प्रक्रिया पूर्ण केली.